हे आर्रर्रर्र ररररा
पिश्यावानी झालं रं..
आरं र्रर्रर्रर्र
खुळ्यावानी झालं रं…
झुंजूर मुंजुर पहाटला
टिपूर-टिपूर चांदणं
दिवस येडा गेला कुठं
भिरभिर नजरला
नाजूक-साजूक भास रं..
दावून चांद सरला कुठं
बांधावर पाय हाती आभाळ घावतया
आपसुक वार नव उरात धावतया
पंखा बिगर जीव ह्यो उड रं…
पैंजण कानामंदी छुनु छुनु वाजतंय
डोळ्याम्होरं नजारा पण सपान वाटतंय…
असा कसा रंग आज गुलाबी उन्हाचा
फुलवानी गंध जणू पाचोळ्याला आला कसा
कानावरी हाक जरी दूरवर न्हाई कुणी
डोळ्याम्होरं चाप आता झोप न्हाई ध्यानी मनी
ह्यो… जीव खेळणीला लगोरी
जीव ह्यो…बघ झालं हाय टपोरी
गावभर उन्नाड
झिम-झिम झिम्माड
रुसलं हसलं फसलं रं....
चित्रपट - झाला बोभाटा
स्वर - ए वी प्रफुल्ल चंद्र
गीत - मंगेश कांगणे
संगीत - ए वी प्रफुल्ल चंद्र
Movie : Jhala bobhata
Music: AV Prafullchandra
Lyrics: Mangesh Kangane
Singer: AV Prafullchandra
No comments:
Post a Comment