Showing posts with label Sanj Garava. Show all posts
Showing posts with label Sanj Garava. Show all posts

Sunday, August 23, 2009

कधी सांज वेळी



कधी सांज वेळी मला आठवोनी
तुझ्या भोवताली जराशी वळूनी
पाहशील का??

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावारुनी जसा गार वारा
वाहशील का??

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का??

तुझ्या आठवण इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही
साहशील का??

गीत: सौमित्र
स्वर : मिलिंद इंगळे
अल्बम : सांज गारवा

हा असा सांज गारवा

हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
अश्या धुंद वेळी तुझा हात माझ्या हाती हवा

उतरून येई आभाळ खाली
किरणे जराशी सोन्यात नाहली
तुझे भास होती चारी दिशांना माझ्या जीवा

झाली जराशी दिवे लागणी
मौनात कोणी गाईल गाणी
उमलून आता मेघात ये चांदण्यांचा दिवा

--सौमित्र

Monday, August 3, 2009

दिस नकळत जाई

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई

असा भरून ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरून राही

- सौमित्र