का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे
एक मी एक तू शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू सा-यात तू
ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू सत्यात तू सा-यात तू
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे
घडले कसे कधी कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे ना तू साथ दे हातात हात दे
नजरेला नजरेतुनी इकरार घे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे
संगीत : अविनाश विश्वजीत
स्वर : स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
चित्रपट : मुंबई पुणे मुंबई