Showing posts with label Premachi Goshta. Show all posts
Showing posts with label Premachi Goshta. Show all posts

Friday, February 8, 2013

ओल्या सांजवेळी






ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 
कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोलना
आभाळ खाली झुके पावलांखाली धुके - २
सुख  हे नवे  सलगी करे का सांगना

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 


सारे जुने दुवे जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देना
माझी हि आर्जवे  पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू  जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाउलखुणा सोबत तुझी साथ दे

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 


वळणावरी तुझ्या पाउस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ  दे
डोळ्यातल्या सारी विसरून ये घरी
ओळख आता खरी  होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ हि तुला

गीत: अश्विनी शेंडे
स्वर : स्वप्नील बांदोडकर, बेला  शेंडे
संगीत: अविनाश  विश्वजीत
चित्रपट: प्रेमाची गोष्ट