Showing posts with label Yanda Kartavya Aahe. Show all posts
Showing posts with label Yanda Kartavya Aahe. Show all posts

Wednesday, October 14, 2009

आभास हा




कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का  
का हे कसे होते असे हि आस लागे जीवा 
कसा सावरू ग आवरू ग मी स्वत:  
दिसे स्वप्नं का हे जागताना हि मला 
आभास हा आभास हा  
छळतो तुला छळतो मला  
आभास हा आभास हा 


क्षणात सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती 
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती  
मी अशीच हासते ऊगीच लाजते पुन्हा तुला आठवते 
मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते 
तू नसताना असल्याचा खेळ हा  
दिसे स्वप्नं का हे जागताना हि मला 
आभास हा आभास हा  
छळतो तुला छळतो मला  
आभास हा आभास हा  


मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे 
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरा कसा रे  
तू इथेच बसना हळूच हसना अशीच हवी मला तू  
पण माहित नाही मला हि अजूनही तशीच आहेस का तू 
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा  
दिसे स्वप्नं का हे जागताना हि मला 
आभास हा आभास हा  
छळतो तुला छळतो मला  
आभास हा आभास हा  


स्वर : वैशाली सामंत आणि राहुल वैद्य  
संगीत : निलेश मोहरीर  
चित्रपट : यंदा कर्तव्य आहे