Showing posts with label Sanai Chaughade. Show all posts
Showing posts with label Sanai Chaughade. Show all posts

Saturday, December 5, 2009

कांदेपोहे

भिजलेल्या  क्षणांना  आठवणींची  फोडणी,
हळदी  साठी  आसुरलेले  हळवे  मन  अन कांती
आयुष्य  हे  चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे


नात्यांच्या  ह्या   बाजारातून  विक्रेत्यांची  दाटी,
आणि  म्हणे  तो  वरचा  जुळावी  शतजन्माच्या गाठी,
रोज  नटावे  रोज  सजावे  धरून  आशा  खोटी,
पाने  मिटुनी  लाजाळू  परी  पुन्हा  उघडण्या  साठी,
आयुष्य  हे  चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे



दूरदेशीच्या  राजकुमाराची  स्वप्ने  पहातांना,
कुणीतरी  यावे  हळूच  मागून  ध्यानीमनी नसताना,
नकळत  आपण  हरवून  जावे  स्वत:स  मग  जपतांना
अन  मग  डोळे  उघडावे   मग  दिवा  स्वप्न पाहताना
आयुष्य  हे  चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे



भूतकाळच्या  धुवून  अक्षता  तांदूळ  केले  ज्यांनी,
आणि  सजवला  खोटा  रुखवत  भाड्याच्या  भांड्यांनी ,
भविष्य  आता  रंगवण्याचा  अट्टाहासही  त्यांचा
हातावरच्या मेंदिवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य  हे  चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे

चित्रपट : सनई चौघडे
गीत: अवधूत गुप्ते
स्वर: सुनिधी चौहान
संगीत: अवधूत गुप्ते