Showing posts with label Natarang. Show all posts
Showing posts with label Natarang. Show all posts

Monday, March 8, 2010

नटरंग उभा



ठुमकीत ठुमकीत तदानी धूमकीट नट नागर नट धीम नट पर्वत
उभा उतुंग नवा घुमतो मृदुंग पखवाज देता वाज झनन झंकार
लेऊनि स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग

रसिक होऊ दे गंध चढू दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला प्राण तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल जाहले दंग || २

ये कडकड बोल ढोलकी हुंगर हि तालाची
आर छुम छुम छनन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच विनंती आमची
किरपेच दान द्यावं जी ए आवजी ||३

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वरणी कशी हि करणी करू साकार
मांडला नवा संसार आता घर दार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल जाहले दंग || २

ये कडकड बोल ढोलकी हुंगर हि तालाची
आर छुम छुम छनन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच विनंती आमची
किरपेच दान द्यावं जी ए आवजी ||३

स्वर : अजय गोगावले
गीत : गुरु ठाकूर
संगीत : अजय अतुल
चित्रपट : नटरंग

खेळ मांडला



तुझ्या  पायरीशी कोनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला...खेळ मांडला


उसवलं गनगोत सारं आधार कुणाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीन; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायला किरपेची ढाल दे
ईनवती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपल रान देवा पेटलं शीवार
तरी न्हाई धीर सांडला.... खेळ मांडला


सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू -हा हुभा
ह्यो तुझ्या उंब-यात खेळ मांडला...
मांडला...

स्वर : अजय गोगावले
गीत : गुरु ठाकूर
संगीत : अजय अतुल
चित्रपट : नटरंग




Friday, February 12, 2010

वाजले कि बारा



हो.. ओ ...चैत पुनवेची रात आज आलीया भरात
धड धड काळजात माझ्या माईना
कधी कवा कुट कसा जीव झाला येडापिसा
त्याचा न्हाई  भरवसा तोल राहीना
राखली ती मर्जी तुमच्या जोडीन मी आले
पीरतिच्या  या  रंगी राया चिंब ओली मी झाले

राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी
पुन्हा भेटू कवा तरी साजणा...
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा -३
ए. कशा  पाई  छळता  माग  माग  फिरता
असं काय करता दाजी  हिला  भेटा  कि  येत्या  बाजारी
ए..सहा ची बी गाडी  गेली नवाची  बी  गेली
आता बारा ची  गाडी  निघाली
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा


हो.. ओ.. अईन्या वानी रूप माझ उभी ज्वानीच्या मी उंब-यात
 नादावल  खुळपीस कबुतर हे माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट हि चांदण्याची
उगा घाई कशा पाई खाई नजर उभ्या गावाची
हे... नारी ग रानी ग हाई नजर उभ्या गावाची

हे....  शेत  आलं राखणीला राघू झाला गोळा 
शीळ  घाली  अडून  कोनी ... करून तीरापा डोळा 
आता कस किती झाकू सांगा कुटवर राखू  
राया भान माझ मला राहीना 
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा -३
ए.... कशा  पाई  छळता  माग  माग  फिरता 
असं काय करता दाजी  हिला  भेटा  कि  येत्या  बाजारी
सहा ची बी गाडी  गेली नवाची बी  गेली
आता बारा  ची  गाडी  निघाली 
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा

हो.... ओ... आला पाड झाला भार भरली उभारी घाटा घाटात 
तंग चोळी अंग जाळी टच डाळिंब फुट व्हटात
गार वारा झोंबनार गाड पदर जागी ठर ना
आडोश्याच्या खोडीच मी कसं गुपित राखू कळना 
हे... ए ..नारी ग रानी ग कसं गुपित राखू कळना 
हे...ए ... मोरावानी  डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या ग वर्साला  मी गाठल वय सोळा 
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा  थोडी 
घडी आताची तुम्ही -हाउद्या ...
मला जाऊ द्या ना.... आता वाजेल कि बारा -२
मला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
ए.... कशा  पाई  छळता  माग  माग  फिरता 
असं काय करता दाजी  हिला  भेटा  कि  येत्या  बाजारी
सहा ची बी गाडी  गेली नवाची  बी  गेली
आता बारा ची  गाडी  निघाली 
हिला जाऊ द्या ना घरी आता वाजेल कि बारा
मला जाऊ द्या ना घरी .... आता वाजेल कि बारा 

गीत : गुरु ठाकूर 
स्वर : बेला शेंडे
संगीत : अजय - अतुल 
चित्रपट : नटरंग 


Saturday, December 5, 2009

अप्सरा आली



ओ... कोमल काया, कि मोहमाया पुनव चांदन  न्हाले,
सोन्यात सजले रुप्यात भिजले, रत्नप्रभा तनु ल्याले
हि नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली,
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली

हो... छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी  मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी कशी हनुवटी नयन तलवार

हि रती मदभरली दागी  ठिणगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली  ताजी रूप हि वा-याची
हि नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली,
मी यौवन बिजली पाहून थिजली, इंद्रसभा भवताली


अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली




चित्रपट : नटरंग
संगीत: अजय अतुल
गीत : गुरु ठाकूर