Showing posts with label Jogava. Show all posts
Showing posts with label Jogava. Show all posts

Saturday, February 5, 2011

मन रानात गेलं ग - जोगवा



 
मन रानात गेलं ग, पानापानात गेलं ग,
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या ता-याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात धुंद धुंद झालं मन.... रानात गेलं ग

सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वा-याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग

चित्रपट :   जोगवा
संगीत  : अजय-अतुल
स्वर     :  श्रेया घोषाल
गीत     :    संजय कृष्णाजी पाटील


  
 

Sunday, August 29, 2010

हरणीच्या दारात वाघर



रिकामी सांजाची   घागर
हरणीच्या  दारात वाघर || २

मनी पेटल काहूर
खुडून  टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर 
रिकामी सांजाची   घागर

रिकामी सांजाची   घागर 
हरणीच्या  दारात वाघर || २ 

मनी पेटल काहूर
खुडून  टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर 
रिकामी सांजाची   घागर

हे डोळ्यामंदी मावना सागर
सागराच्या पायी कोण वावर || २
भरलं भरलं आभाळ
हरलं नशीब हरलं

मनी पेटल काहूर
खुडून  टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर 
रिकामी सांजाची   घागर

हे काळजाला सुटलाय गहिवर
मातीचा बी अटलाय पाझर || २
तुटलं तुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं

मनी पेटल काहूर 
खुडून  टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर 
रिकामी सांजाची   घागर

गीत : संजय कृष्णाजी पाटील
स्वर : आनंद शिंदे
संगीत : अजय अतुल
चित्रपट : जोगवा

Monday, April 19, 2010

घे लल्लाटी भंडार - जोगवा




नदीच्या पल्याड आईचा डोंगुर, डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर 
घालू जागर जागर डोंगर माथ्याला...
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

नदीच्या पान्यावर आईला पूजत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जिवाच्या घुंगराला...
घे लल्हाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू, 
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्‍हाव तू,
देवी माझ्या अंतरी र्‍हावं तू, काम क्रोध परतुनी लाव तू 
काम क्रोध परतुनी लाव तू , देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून तुझी मूरत पाहीन मूरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुगर्‍या वाहीन, घुगर्‍या ‍वाहीन तुझा भंडारा खाईन 
द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला, द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर 
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं 
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर 
आई तुझा मायेचा पाझर, सागर ह्यो- भक्तीचा सागर

खणानारळानं ओटी मी भरीन, 
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन,माझी ओंजळ भरीन 
आई सांभाळ सांभाळ तुझी च लेकराला
आई सांभाळ सांभाळ तुझीच लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून डोंगर येंगुन उघड देवी दार(2)

यलम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
प्रेमाची भाकर दाविती ही, जमल्या गं लेकरं 
हेऽऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर 
आई तुझा मायेचा पाझर सागर ह्यो- भक्तीचा सागर


स्वर : अजय गोगावले 
गीत  : संजय पाटील 
संगीत : अजय अतुल 
चित्रपट : जोगवा 

Saturday, December 5, 2009

जीव रंगला



जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू 

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा  चांद तू 

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल 
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू 

खुलं आभाळ ढगाळ 
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू 
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ 


जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची  आस तू 
जीव लागला  लाभला 
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल