पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
ओलेत्याने दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध
निस्तब्ध मनाची वेस
[संदीप]
पाऊस सोहळा झाला
कोसळत्या आठवणींचा...
कधी उधाणता अन केव्हा
कोसळत्या आठवणींचा!
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
पाऊस कशाने आला?
गात्रांतून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला...
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..
पाऊस असा रुणझुणता....
गीत : संदीप खरे
स्वर : सलील कुलकर्णी
संगीत : सलील कुलकर्णी
अल्बम :सांग सख्या रे
No comments:
Post a Comment