Showing posts with label Lagn Mubarak. Show all posts
Showing posts with label Lagn Mubarak. Show all posts
Friday, June 14, 2019
तू भेट ना - लग्न मुबारक
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
रंग हा सारा नवा नवा
वाटे हवा हवा गंध हा
स्पर्श हा करी वेडापिसा
लागे जिवा तुझा छंद हा
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
हरवून गेल्या किती राती
शोधताना कुणी
बरसून गेल्या सरी साऱ्या
तरी कोरडा मी
सारे रिते सारे सुने
तुझिया विना तू भेट ना
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
चित्रपट - लग्न मुबारक
स्वर - हर्षवर्धन वावरे
गीत - क्षितिज पटवर्धन
संगीत - ट्रॉय - आरिफ
Movie - Lagna Mubarak
Singer - Harshvardha Wavare
Lyrics - Kshitij Patvardhan
Music - Troy - Arif
देवा तुझ्या नावाचं - लग्न मुबारक
देवा…….
देवा तुझ्या नावाच
मी गातोय गारण
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहाण……२
नात माझ असूनही
मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनही जवळ
नाही मी कुणात
शिवरायांचा मावळा मी
ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतल हे मी कुराण……२
दोन जीवाचा र
खेळ कुणी मांडला र
जिच्यासाठी जगलो तिचा
नाही र आधार…….२
प्रेमासाठी प्रेम माझ
केल मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहाण……२
नात माझ असूनही
मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच
केला माझा घात…..२
माझ्या आपुल्या नात्यासाठी
दे र तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहान…..२
चित्रपट - लग्न मुबारक
स्वर - आदर्श शिंदे
गीत - अक्षय कर्डक
संगीत - साई - पियूष
Movie: Lagn Mubarak
Singer: Adarsh Shinde
Lyrics: Akshay Kardak
Music: Sai- Piyush
Subscribe to:
Posts (Atom)