भिजून गेला वारा रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा पिऊन पाउस ओला
येना जरा तू येना जरा.. चाहूल हलके देना जरा
येना जरा तू येना जरा.. चाहूल हलके देना
झिम्माड पाउस तू नको जाउस चुकार ओठ हे बोले
श्वासात थरथर सरीवरी सर... मन हे आतुर झाले
येना जरा तू येना जरा.. मिठीत हलके घेना जरा
येना जरा तू येना जरा.. मिठीत हलके घेना
स्पर्शात वारे निळे पिसारे... आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू.... कसे दोघात जग हे न्हाले
येना जरा तू येना जरा.. मिटून डोळे घेना जरा...
येना जरा तू येना जरा.. मिटून डोळे घेना...
चित्रपट - इरादा पक्का
गीत -
स्वर -
संगीत - निलेश मोहरीर