Showing posts with label Aayushyawar Bolu Kahi. Show all posts
Showing posts with label Aayushyawar Bolu Kahi. Show all posts

Thursday, December 22, 2011

आताशा.. असे हे - आयुष्यावर बोलू काही




आताशा.. असे हे.. मला काय होते!!!
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावळा    रंग , होतो मनाचा...
असे हाल ते .. आत हळुवार काही...
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यर्थ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो किनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कळावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

अल्बम : आयुष्यावर बोलू काही
स्वर : सलील कुलकर्णी
संगीत : संदीप खरे
गीत : संदीप खरे

Sunday, February 28, 2010

हे भलते अवघड असते - आयुष्या वर बोलू काही




गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला


हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...


तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...


तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...


कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...


परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते..



गीत : संदीप खरे 
स्वर : संदीप खरे , सलील कुलकर्णी 
संगीत : संदीप खरे 
अल्बम : आयुष्यावर बोलू काही 


Saturday, February 27, 2010

नसतेस घरी तू जेव्हा - आयुष्यावर बोलू काही




नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !


गीत : संदीप खरे
स्वर  : सलील कुलकर्णी
संगीत : संदीप खरे
अल्बम : आयुष्यावर बोलू काही



Monday, August 3, 2009

आयुष्या वर बोलू काही




जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

शब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
शब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

गीत : संदीप खरे
स्वर : संदीप खरे , सलील कुलकर्णी
संगीत : संदीप खरे
अल्बम : आयुष्यावर बोलू काही