Showing posts with label Bedhund. Show all posts
Showing posts with label Bedhund. Show all posts

Monday, April 19, 2010

हा चंद्र तुझ्यासाठी - बेधुंद



हा चंद्र तुझ्यासाठी हि रात तुझ्यासाठी
आरास हि ता-यांची गगनात तुझ्यासाठी ||२||

कैफात अश्या वेळी मज याद तुझी आली
येना... ओव्हरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू


वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहारू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते फुल जसे कि फुलताना दरवळते
इतके मज कळते अधुरा मी येथे चंद रात हि बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला

येना... ओव्हरत्या स्वप्नांना घेऊन ये तू 
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू 
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू 

हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताली 
चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली 
आज तुला सारे काही सांगावे विलगुनीया तू मजला ते ऐकावे ..
होउन कारंजे उसळी मन माझे  पाउल का अजुनी न तुझे वाजे 
जीव माझा व्याकुळला दे आता हाक मला 
येना... ओव्हरत्या स्वप्नांना घेऊन ये तू 
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू 
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू 

स्वर : स्वप्नील बांदोडकर 
अल्बम : बेधुंद