Showing posts with label Khulach Jhaalo G. Show all posts
Showing posts with label Khulach Jhaalo G. Show all posts
Friday, May 3, 2019
खुळाच झालो गं..
खुळाच झालो गं..
आज उठं उरामंदी, कुठली ही लाट रं ?
जणू जीव जडला तुझं पडलं सपानं !
धाकधूक जरा थोडी, उलघाल खुळी येडी;
भेटायाची गोडी अशी, लागली जीवा.
काय कुणा सांगू कसं ? येड्यावानी भास तुझं;
टकुऱ्यात भिन्लं असं...
खुळाच झालो गं..
सुदभान हरलोया मी, पापनी लवत न्हाई.
तहानली नजर माझी, तुला बघण्यापायी.
इपरीत घडलं कसं ? कुणी मंतरलं जसं !
आपसूक मनाची या, तार छेडली.
धडधड काळजात, जीव लागं ना कशात.
जागतोया रातंदिसं...
खुळाच झालो गं..
नादावला जीव असा, वाट लागली
चांद आन चांदनी, झाली ग जुनी
तुझ्या पुढं फिकी सुनी, अप्सरा परी.
असा तुझा झाला जीव, कधी कसा कुणा ठावं ?
नावं तुझ्या केलं जीनं...
नावं तुझ्या केलं जीनं...
खुळाच झालो गं..
स्वर - ऐश्वर्य मालगावे
संगीत - ऐश्वर्य मालगावे
शब्द - संजय नवगीरे
Marathi Single - Khulach Jhaalo Ga
Singer - Aishvarya Malgave
Music - Aishvarya Malgave
Lyrics - Sanjay Navgire
Subscribe to:
Posts (Atom)