Showing posts with label Funtroo. Show all posts
Showing posts with label Funtroo. Show all posts

Thursday, July 27, 2017

कसा जीव गुंतला - फुंतरु

मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा
कसा जीव गुंतला
मनाला मनाचे वेड लागते पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
तुझे रूप असावे खळखळणाऱ्या मुक्त झऱ्याचे
तुझे स्पर्श असावे विरघळणाऱ्या शुभ्र धुक्याचे
हातात हात दे जरा
ये जवळ ये ना जरा
स्वप्न साकारले हे जणू
आभास झाला खरा
कधी तोल जावा
कधी सवरावा हे पांघरून घेऊ चांदणे
या तुझ्या चाहूलीने मुके शब्द होती
बोलू लागती स्पंदने
सांगू कुणाला कसा मी
माझ्या मानाची व्यथा मी
का राहिलो एकटा मी
हा कसा जीव गुंतला
तुझे श्वास असावे दरवळणारे गंध फुलांचे
तुझे प्रेम असावे  उलगडणारे बंध मनाचे
शहारा सुखाचा
गोड भासतो पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
इशारा हवासा
रोज छेडतो पुन्हा पुन्हा
कसा हा जीव गुंतला
मनाला....
चित्रपट - फुंतरु
स्वर - हृषीकेश रानडे, केतकी माटेगावकर

ती मी - फुंतरु

ती स्वप्नातल्या परीसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातुनी सजावी तशी
मी असा वेडासा कधी थोडासा
स्वतःशी हसतो नशा प्रेमाची
तिच्या स्पर्शाची मनाशी जपतो
कधी कुठे मिळाव्या वळणावरती वाटा ह्या.. दोन्ही
ती चढते नशा बेधुंदशा श्वासापरी
ती कैफातल्या बेफिक्रशा भासापरी
सहजच यावे ओठांवरती
गीत जसे भेटते कोणी
गुणगुणताना भिरभिरते
बनून पाखरू मनासभोवती
हसताना ती भुलतोच मी
लपताना तू झुरतो मी
मन माझे वेडे हे सावरू..कसे
ती स्वप्नातल्या परीसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातुनी सजावी जशी
चित्रपट - फुंतरु
स्वर - जसराज जोशी
गीत -
संगीत -