Showing posts with label Aggobai Dhaggobai. Show all posts
Showing posts with label Aggobai Dhaggobai. Show all posts

Saturday, June 12, 2010

दूरदेशी गेला बाबा










दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , तरी  घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , तरी घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

गीत : संदीप खरे
संगीत : सलील कुलकर्णी
स्वर : सलील कुलकर्णी
अल्बम  : अग्गोबाई ढग्गोबाई