Showing posts with label sandhiprakashat. Show all posts
Showing posts with label sandhiprakashat. Show all posts

Saturday, June 12, 2010

संधीप्रकाशात



आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडे गोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंज-याचे  दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो  यावी

असावीस पास जसा स्वप्नं भास
जीवी कासावीस झाल्याविन
संधीप्रकाशात अजून को सोने
तो माझी लोचने मिटो  यावी

तेव्हा सखे आन तुळशीचे पान
तुझ्या घरी वान नाही त्याची
तूच ओढलेलेल त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे

संधीप्रकाशात अजून को सोने 
तो माझी लोचने मिटो  यावी 

वाळल्या ओठां  दे निरोपाचे फुल 
भूलीतली भूल शेवटली 
संधीप्रकाशात अजून जो सोने 
तो माझी लोचने मिटो  यावी 

असावीस पास जसा स्वप्नं भास 
जीवी कासावीस झाल्याविन
संधीप्रकाशात अजून जो सोने 
तो माझी लोचने मिटो  यावी 

गीत : बा भ बोरकर 
संगीत : सलील कुलकर्णी 
स्वर : सलील कुलकर्णी 
अल्बम : संधीप्रकाशात

Sunday, August 16, 2009

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावर हि या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी
माझे जगणे होते गाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनास्त्व कधी मनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे
माझे जगणे होते गाणे

आलापींची संथ सुरावळ
वारा गांचा संकर गोंधळ
आलापींची संथ सुरावळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे
माझे जगणे होते गाणे


राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे
माझे जगणे होते गाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
माझे जगणे होते गाणे


कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनास्त्व कधी मनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे
माझे जगणे होते गाणे

कवी: कुसुमाग्रज
स्वर: सलील कुलकर्णी
अल्बम: संधीप्रकाशात