Showing posts with label Time Please. Show all posts
Showing posts with label Time Please. Show all posts

Friday, December 6, 2013

कधी ना कधी - टाईम प्लीज




कधी ना कधी -- ६

मी दूर दूर जाताना
इतकेच मनाशी वाटे
अनोळखी या वळणावर
जुळून यावे हे नाते
हा काळोखाचा पदर
होईल कधी तरी दूर
स्वप्नांच्या  गावी येईल
मग आठवणीचा पूर
समजावितो मी या मला
कधी ना कधी -- ६

वाटा या बंद सा-या
आसवांना नसे किनारा
ये तू घेऊन आता
वादळाचा आवेग सारा
मग विरून जाइल अंतर
अन फुटेल सगळा  बांध
कोसळत्या दोन मानांचा
जुळेल रेशीम बंध
आठवेल सारे बघ तुला
कधी ना कधी -- ६

राती सुन्या सुन्या ह्या
दिवस जाळी  क्षणा क्षणांना
हाती तुझ्याच आहे
मोडलेला हा निवारा
कुठल्याशा एका वेळी
बस वळून पहा तू मागे दिसतील तुला तेव्हा हे
वाटेवर डोळे माझे
परतून येशील तू पुन्हा
कधी ना कधी -- ३

चित्रपट: टाईम प्लीज
गीत:
संगीत: ऋषिकेश कामेरकर
स्वर: स्वप्नील बांदोडकर