Tuesday, February 26, 2019

भेटली तू पुन्हा - शीर्षक गीत





भेटली तू पुन्हा का नवी भासली तू मला सांग ना
शब्द ना बोलले, बोलके हे उसासे मुक्या भावना
का हे होते असे आज माझ्या मना
ती तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा
का से गुंतणे ठाव नाही कुणा
कोणता खेळ हा कोणत्या या खुणा
तू तिथे मी इथे
अंतरे ना तरी का दुरावा नवा
भेटली तू पुन्हा
पाहिले मी तुला माझ्याविना
मी तुला पाहता का गुंग होतो असा
तू दंग होता जरा हा छंद होई जसा
आहे तू कोणती आहे मी कोणता
सोबतीने तुझ्या हे कळेना मला
गुंफले का असे तुझ्यात मला
शोधता मी मला शोध लागे तुझा
थांब न तू जरा भान गेले कुठे शोधू दे ना मला
भेटली तू पुन्हा भेटतो
मी मला आज माझ्याविना
दूर तू जाता मना हुरहूर का आता
ओढ लागे का का तुझी पावलांना या
भास का तुझा हवा हवासा या मना
मी नव्या वाटेवरी वळणाशी तू पुन्हा
दूर होता अशी नजरेच्या जरा
शोधूनी मी तुला कावरा बावरा
तू अशी ना इथे जाण आहे मला
गुंततो मी तरी पाहुनी का तुला
होऊदे भास हे शोधू ये गुंतण्याचा बहाना नवा
भेटली तू पुन्हा
दाटली तूच तू आज माझ्या मना.....

चित्रपट - भेटली ती पुन्हा
गीत - संजय जामखंडी
संगीत - विवेक देऊलकर
स्वर - निखिल मोदगी


Movie – Bhetali Tu Punha
Music – Vivek Deulkar
Lyrics – Sanjay Jamkhandi
Singer – Nikhil Modgi

No comments:

Post a Comment