तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलोनाही कळले कधी नाही कळले कधी
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी
गूढ हुरहूर ही श्वास गंधाळला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी
तू मला मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
तू कळी कोवळी साजिरी गोजरी ,
चिंब ओल्या सरी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे ,स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो तू मला मी तुला
गूढ हुरहूर ही ,श्वास गंधाळला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी
शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी
तू मला मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
तू मला मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी.....
मलिका - होणार सुन मी या घरची
स्वर - डॉ. सलिल कुलकर्णी
स्वर - डॉ. सलिल कुलकर्णी