Showing posts with label Vaadalwaat. Show all posts
Showing posts with label Vaadalwaat. Show all posts

Saturday, December 5, 2009

वादळवाट शीर्षक गीत




थोडी सागर निळाई थोडे शंख नी शंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वाऱ्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळची वाट


गीत        - मंगेश कुळकर्णी
संगीत-अशोक पत्की
स्वर-देवकी पंडीत
मालिका-वादळवाट