Saturday, March 30, 2019

आज प्रेमाची - वृंदावन



आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

नजरे मधूनी बोलू दोघे
क्षण वाटे हा हवा हवा
हुरहूर वाढे श्र्वासांची या
का जीव वेडा पिसा

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

भासते आयुष्य सारे
बावरे स्वप्न नवे
सांज ही गांधाळताना
चाहूल देई का ऋतू हा वेगळा
आज नव्याने का भेटते मी मला

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

गुंतले मन हे माझे
पाहता वाट तुझी
गंध तो दरावळताना
देऊन जातो आभास हा वेगळा
बेधुंद व्हावेसे आज वाटे पुन्हा

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

चित्रपट - वृंदावन
स्वर - आनंदी जोशी आणि हर्ष वर्धन वावरे
गीत - मंदार चोळकर
संगीत - अमित राज

Movie - Vrundavan
Singers - Anandi Joshi, Harshwardhan Wavare
Lyrics - Mandar Cholkar
Music - Amitraj

No comments:

Post a Comment