Showing posts with label Double Seat. Show all posts
Showing posts with label Double Seat. Show all posts

Sunday, August 30, 2015

किती सांगायचय मला - डबल सीट






किती सांगायचय मला किती सांगायचय 
किती सांगायचय मला किती सांगायचय 
कोरडया जगात माझ्या,
भोवती चार भिंती 
बोचरे नकार सारे 
आशा क्षणात विरती 
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती 
मनाच्या पाऱ्याला मग आवरू किती 
किती सांगायचय मला किती सांगायचय 

मना ,
हवे असे, अलावारसे कोणा कसे सांगायचे हे गाणे 
मना,
माझ्या जागी जा रंगुनी पाहून घे हे स्वप्न दिवाणे 

हलके हलके 
सुख हे बरसे 

हलके हलके 
सुख हे बरसे 

मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर 
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर 
घेऊदे मनाला श्वास मोकळा




किती सांगायचय मला किती सांगायचय 

हसऱ्या सुखाचा पहिला वहिला मोहर हा 
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा 
क्षण हे हळवे जपावे , इवल्या ओठी हसावे 
आज चिंब व्हावे 
पार पैल जावे 
किती सांगायचय 
मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर 
मनाच्या गावी असे दोघांचेच घर 
घेऊदे मनाला श्वास मोकळा 



गीत - स्पृहा जोशी 
संगीत - हृषिकेश , सौरभ , जसराज 
स्वर - जसराज जोशी , आनंदी  जोशी 
चित्रपट - डबल सीट