Showing posts with label Zenda. Show all posts
Showing posts with label Zenda. Show all posts

Saturday, February 18, 2012

सांग ना रे मना - झेंडा




अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे
आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना
सांग ना रे मना, सांग ना रे मना।।२।। 

श्वास गंधाळती शब्द भांबावती
रोम रोमातले कंपने बोलती
मोहरे मोहरे पाकळी पाकळी
भरलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना
सांग ना रे मना, सांग ना रे मना।।२।। 


हे नवे भास अन ह्या नव्या चाहुली
ऐकू ये कोठूनी साद हि मलमली
गोठले श्वास अन स्पंदने थांबली
हे शहारे जणू रेशमाच्या झुली
आज ओथंबल्या का अशा भावना
सांग ना रे मना, सांग ना रे मना।।२।।

गीत:
स्वर: स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
संगीत : अवधूत गुप्ते
चित्रपट : झेंडा



Monday, March 8, 2010

सावधान - झेंडा



सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान वणवा पेट घेत आहे ||२

काळोखाच्या साम्राज्याला टिट लावून भागणार नाय
दृष्टं लागली परक्यांची तरीहि का तू जगणार नाय ||२
उठ मराठ्या क्षितीज बघ तुला साद देत आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान वणवा पेट घेत आहे

मरहट्यांच्या नशिबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे ||२
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान वणवा पेट घेत आहे

पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
प्रधान इथले मस्तवाल अन सुस्त जाहले मावळे ||२
असो पहाडा परी शत्रू तरी तू सुरुंग आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान वणवा पेट घेत आहे

स्वर : अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर
गीत : अरविंद जगताप
संगीत : अवधूत गुप्ते
चित्रपट : झेंडा

Sunday, January 24, 2010

पत्रास कारण कि



पत्रास कारण कि बोलायाची हिम्मत नाई  ||२
हो... ओ पावसाची वाट बगण्या आता काही गम्मत नाई ... हिम्मत नाई
पत्रास कारन  कि बोलायाची हिम्मत नाई

माफ कर... पारो मला.. नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पिकाला ग नाही कवड्या भेटल्या
चार बुक शिक असं कस सांगू पोर
गहान ठेवतात बापाला का विचार कोना सावकारा
गुरांच्या बाजरी हित मनसा मोल  न्हाई
मी न्हाई बोललो पण पोरा   तू तरी बोल काही

पावसाची वाट बगण्या आता काही गम्मत  नाई ... हिम्मत  नाई
पत्रास कारन  कि बोलायाची हिम्मत नाई

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुमाले पिळून घेतलं
पन कोरड्या जीमिनीन सार पिक गिळून घेतलं
न्हाई लेकरा भाकर न्हाई गुरा चारा...
टिपूस न्हाई आभाळात गावाच्या डोळ्यात धारा
कर्जापाई भटकून शिरपा  गेला लटकून ||२
दारुपाई गेला अस लिवला त्यांनी हटकून
गडी होता मराठी ||२ पन राजाला किंमत न्हाई ||२

हो... ओ पावसाची वाट बगण्या आता काही गम्मत नाई ... हिम्मत नाई
पत्रास कारन  कि बोलायाची हिम्मत नाई

आई तुज्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी
न्हाई मला जमल ग तुज साद औशीद पानी
मैलोमल हित कुट दवाखाना न्हाई
रोगर मात्र सजासजी कुट बी गावतंय आई
शेतात न्हाई कामाच ते जीव द्याया आल कामी ||२
माझं आन सरकारच  व्हज आता व्हइल कमी
मरता मरता कळल हित शेतक-या किंमत न्हाई ||२

हो... ओ पावसाची वाट बगण्या आता काही गम्मत नाई ... हिम्मत नाई
पत्रास कारन  कि बोलायाची हिम्मत नाई


स्वर : अवधूत गुप्ते
गीत :
संगीत : अवधूत गुप्ते
चित्रपट : झेंडा





झेंडा शीर्षक गीत



जगन्याच्या  वारीत मिळेना वाट हो..ओ
साठले मोहाचे धुके घनदाट हो..ओ
आपलीच मानस आपलीच नाती
तरी कळपाची मेंढराला भीती
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३

आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्याचा देव होता || २
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता || २
उजळावा दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचा-या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३

बुजगावन्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई ||२
खळ रीत रीत माझं बघूनी उमगलं
कुंपण हित शेत खाई ||२
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी
झेंडे येगळे येगळ्या जाती
सत्याचीच भक्ती सत्याचीच प्रीती
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३

स्वर : ज्ञानेश्वर मेश्राम
गीत :
संगीत : अवधूत गुप्ते
चित्रपट : झेंडा