Showing posts with label Damlelya Babachi Kahani. Show all posts
Showing posts with label Damlelya Babachi Kahani. Show all posts

Saturday, June 12, 2010

दमलेल्या बाबची कहाणी



कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी ||२
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू  पोरी मला तोंड नाही,
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजतेच तरी पण येशील कुशीत,
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबची कहाणी  तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघुम राजा करी लोकलची वारी||२
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी,
स्वप्नातल्या गावा मधे मारू मग फेरी
ख-याखुर्‍या  परि साठी गोष्टीतली परि ,
बांधींन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ऑंफीसात उशिरा असतो मी बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून ,
तास तास  जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझुन,
अशावेळी काय सांगू काय काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे.
वाटते की उठुनिया तुज़या पास यावे
तुझ्या साठी मी गे पुन्हा लहान व्हावे
उगाचच  रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी....
उधळत खिधळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही ,
हासूनिया उगाचच ओरडेल काही
दुरुनच आपल्याला बघणारी आई ,
तरी सुद्धा दोघे जण   दंगा मांडू असा 
क्षणा  क्षणा वर ठेवू खोडकर ठसा ,
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबची कहाणी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई ,
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी.
कुशी माझी सांगत आहे एक बाळा
काही सदोदित जरी का मी तुझा पास नाही ,
जेऊ माखु नाहू खाऊ  घालतो ना तुला आई
परी वेणी फणी  करतो ना तुला ,
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुळा 
तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा

सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबची कहाणी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेंव्हा  घराचा तू ताबा
लूटू लूटू  उभ रहात टाकलस पाऊल पहिल
दूरच पहात राहिलो फक्त जवळ पाहायचच राहील
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून 
हल्ली तुला  झोपेतच पाहतो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो 
लवकर जातो आणि उशिरानी येतो,
बालपण गेले तुझे गुज निसटून उरे
काही तुझा माझा ओंजळी मधून ,
जरी येते ओठी  तूज्या माज्यासाठी
हसे नजरेत तुज्या काही अनोळखी दिसे ,
तुज्या जगातून बाबा हरवेल का ग?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मधे
बाबसाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,


गीत : संदीप खरे
संगीत : सलील कुलकर्णी