सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा
अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी
मोहवी धुंद तू मनाचा
विखरुनी चांद रात काळजात माझिया
मोहरे चेहरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा
हि साद त्या तारकांची
हृदयी नक्षी तुझ्या रुपाची
टप टपतो मनी तुझाच मोगरा
तुझिया साठी होई जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या
वाटतो आसरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा
झुरतो झुलतो सदा थरारे
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी ओठाम्बुनी
विरही सरही या जीवनी
भिजवून जा अशी जीवनास माझिया
लागू दे तुझी तृषा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा
अल्बम - तुला पहिले
स्वर - स्वप्नील बांदोडकर