Showing posts with label Ajintha. Show all posts
Showing posts with label Ajintha. Show all posts

Sunday, July 21, 2013

मन चिंब पावसाळी - अजिंठा


मन चिंब पावसाळी झाडात  रंग ओले 
घन  गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले 

पाउस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी 
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुम्बी 

मन चिंब पावसाळी झाडात  रंग ओले 
घन  गर्द सावल्यांनी  आकाश वाकलेले 

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा 
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून  घट्ट घ्यावे 
आकाश पांघरुनी मन दूर दूर जावे 

मन चिंब पावसाळी झाडात  रंग ओले 
घन  गर्द सावल्यांनी  आकाश वाकलेले 

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी 
डोळ्यात गलबतांच्या मन मोर रम्य गावी 
केसांत मोकळ्या त्या वेटाळूनी फुलांना 
राजा पुन्हा नव्याने  उमलून आज यावे 

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले 
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले 


चित्रपट - अजिंठा 
गीत  - न. धो . महानोर 
संगीत - कौशल इनामदार 
स्वर - हंसिका अय्यर