Showing posts with label Bandh Premache. Show all posts
Showing posts with label Bandh Premache. Show all posts

Sunday, May 23, 2010

चिंब भिजलेले - बंध प्रेमाचे




ह्या  रिमझिम झिरमिळ    पाऊस  धारा,
तन  मन  फुलूवून  जाती
ओ...  ह्या रिमझिम  झिरमिळ  पाऊस  धारा,
तन  मन  फुलूवून  जाती
सहवास   तुझा  मधुमास  फुलांचा,
रंग  सुखाचा  हाती
हा  धुंद  गार  वारा, हा  कोवळा  शहारा
उजळून  रंग  आले , स्वच्छंद   प्रीतीचे

चिंब  भिजलेले , रूप  सजलेले
बरसुनी  आले  रंग  प्रीतीचे||2


ओढ  जागे  राजसा रे, अंतरी  सुख बोले
सप्तरंगी  पाखरू  हे, इंद्रधनू  बनू   आले
लाट  हि  , वादळी , मोहुनी  गाते
हि  मिठी  लाडकी  भोवरा  होते.
पडसाद  भावनांचे , रे  बंध  ना  कुणाचे
दाही  दिशांत  गाणे, बेधुंद  प्रीतीचे

चिंब  भिजलेले , रूप  सजलेले
बरसुनी  आले  रंग  प्रीतीचे||2

घेऊन ओले पंख आले रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेल हे ताल छंदांचे
घन व्याकूळ  रिमझिमणारा
मन अंतर दरवळणारा
हि स्वर्ग सुखाची दारे 
हे गीत प्रीतीचे

चिंब  भिजलेले , रूप  सजलेले
बरसुनी  आले  रंग  प्रीतीचे||२ 


स्वर :  शंकर महादेवन
संगीत : अजय अतुल
चित्रपट : बंध प्रेमाचे