Showing posts with label Aai Shappath. Show all posts
Showing posts with label Aai Shappath. Show all posts

Saturday, February 5, 2011

ढग दाटुनी येतात - आई शप्पथ



ढग दाटुनी येतात
मन वाहुनी नेतात ||२
ऋतू  पावसाळी सोळा
थेंब होऊनी  गातात
झिम्माड पाण्याची
अल्लड गाण्याची ||२
सर येते........ माझ्यात

माती लेउनिया गंध
होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो
एक बंध बंध
मूळे हरखून जातात
झाडे पाउस होतात

ऋतू  पावसाळी सोळा 
थेंब होऊनी  गातात
झिम्माड पाण्याची 
अल्लड गाण्याची ||२ 
सर येते........ माझ्यात 

जीव होतो ओलाचिंब 
घेतो पाखराचे पंख 
सार्या आभाळाला देतो 
एक ओलसर रंग रंग रंग 
शब्द भिजुनी जातात 
अर्थ थेंबांना येतात 
झिम्माड पाण्याची 
अल्लड गाण्याची ||२ 
सर येते........ माझ्यात 


चित्रपट : आई शप्पथ 
स्वर : साधना सरगम 
संगीत : अशोक पत्की 
गीत :