नाजूक जपले गंध फुलांचे
आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली
बर्फ वितळले सारे
मी शब्दांच्या काठावरती
शोधत असता काही
हलके हलके मौनामध्ये
अर्थ मिसळले सारे
बर्फ वितळले सारे
नाजूक जपले गंध फुलांचे
आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली
बर्फ वितळले सारे
पदर धुक्याचा शिखरावरुनी
हलके घसरत गेला
नेत्रा मधुनी गात्रा मधुनी उन उजळले सारे
बर्फ वितळले सारे
नाजूक जपले गंध फुलांचे
आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली
बर्फ वितळले सारे
मालिका - तुझ माझ जमेना