Showing posts with label Timepass. Show all posts
Showing posts with label Timepass. Show all posts

Saturday, December 7, 2013

मला वेड लागले प्रेमाचे - टाईमपास



रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे
हे नाव ओठी कोणाचे
का सांग वेड्या मना
मला भान नाही जगाचे
मला  वेड  लागले प्रेमाचे
मला  वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

नादावले धुंदावले
कधी गुंतले मन बावरे
न काळे कसे कोणा मुळे
सूर लागले मन मोकळे
हा भास कि तुझी  आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
हा मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला
कोणी भेटले माझे मला
खुलत कळी  उमलून हा
मन मोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे  नशा
मला साद घालती दाही दिशा
हा मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

चित्रपट : टाईमपास
गीत :गुरु ठाकूर
संगीत : चिनार
स्वर : स्वप्नील बांदोडकर , केतकी माटेगावकर 


फुलपाखरू - टाईमपास




फुलपाखरू!..
छान किती दिसते फुलपाखरू
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू

डोळे बारीक करती लुकलुक
गोल मणी  जणू ते फुलपाखरू

छान  किती दिसते फुलपाखरू

मी धरू जाता येई न हाता
दूरच ते उडते फुलपाखरू
छान  किती दिसते फुलपाखरू

चित्रपट: टाईमपास
गीत:  ग.ह. पाटील
संगीत: चिनार
स्वर : स्वप्नील बांदोडकर 


दाटले हे धुके - टाईमपास




मौला इश्क़ है  खुदा
दुहाई देती है  जुबां
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा.

बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले हे धुके हा….

दिवे लाखो मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके
दाटले हे धुके हा.….

मौला इश्क़ है  खुदा
दुहाई देती है  जुबां

रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली  रे ना कळे ॥२
बेफिकार मन हे झाले
घन  प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा.….

हो बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले हे धुके हा…

won't you stay with me 
won't you be with me
no matter where i go
you are the one 
ohh I Love You baby I Love You
won't you stay with me 
won't you be with me
no matter where i go
you are the one 
ohh I Love You baby I Love You

झेलते  हलके हलके पावसाच्या सारी
आठवून का तुला रे झाली मी बावरी

बेफिकर मन हे झाले
घन प्रेमाचे आले
सोपे होईल सारे तुझ्या सवे

दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा.
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके हे
दाटले हे धुके हा.

मौला इश्क़ है  खुदा
दुहाई देती है  जुबां

चित्रपट : टाईमपास
गीत:
संगीत: चिनार
स्वर: महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर 


हि पोली साजूक तुपातली - टाईमपास




हलद  लावते ग सवत्या माल्यान
इडा दिला ग गावच्या देवाला
आली आली व कुंदा बाई
आक्काची हि माऊली
कुंदा आली हलद लावा अक्काबाईचे

ए  मावशे ए ताई ए  कमला
आक्काच्या लग्नाला गान गाव

पैल्या धारच्या प्रेमाने साला
काळीज केलाय बाद
हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय  नाद || २

आरुन आरुन करू नको इशारा
भिडू दे आता डोल्याला डोला || २
हिथ  बी ठिणगी तिथ बी ठिणगी
ए  बाला जा रे
हिथ  बी ठिनगी तिथ बी ठिनगी
जोसान पेटू दे आग

हि पोली साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय  नाद || २
ए  बाला ए  बाला बाला …… बाला बाला

चोरून जरी ह्यो गेट मेट झाला
खबर झायली कोली  वाऱ्याला

लागलाय ह्याचा तोल सुटाया
अग सांभाळ
इस्काची फुटलिया लाट
हि पोली  साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय  नाद
अरे हि पोली…….  तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय  नाद

हि पोली  साजूक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय  नाद

चित्रपट: टाईमपास
गीत:
संगीत: चिनार
स्वर: रेश्मा सोनावणे, मनोहर कोलाम्ब्रे