Showing posts with label Eka Lagnachi Tisari Goshta. Show all posts
Showing posts with label Eka Lagnachi Tisari Goshta. Show all posts

Sunday, October 13, 2013

एक लग्नाची तिसरी गोष्ट शीर्षक गीत





प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला
प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला

मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे
प्रेमाच्या कुपीत  नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे
प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला

प्रेमाच्या प्रवाही प्रेमाचे भोवरे प्रेमाची वादळे येती जरी
प्रेमाच्या लाटा या प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी
प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला


मालिका - एक लग्नाची तिसरी गोष्ट
स्वर - सचिन पिळगावकर, अंजली कुलकर्णी
संगीत - डॉ सलिल कुलकर्णी
शब्द - संदीप खरे