Showing posts with label Deva. Show all posts
Showing posts with label Deva. Show all posts

Friday, November 30, 2018

रोज रोज नव्याने - देवा




अधीर होईल मन  पुन्हा  सुखाने
वाट पाहील तेही आनंदाने
तू भेटना...रे रोज रोज नव्याने..
सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से उन होऊन ये जरा
बिलोरी चांदण्या कानात माळून
भरले आभाळ  होऊन...

कधी कधी बरसून ये
कधी कधी हमसून ये
कधी कधी दाटून येना जरा
कधी कधी सांगून ये
कधी कधी न सांगता
कधी कधी फसवून येना जगाला साऱ्या

क्षण साद ही देतील नव्याने
तू भेटना रे रोज रोज नव्याने
श्वासात भरून माळ कधी फुले
होऊन ये तू कधी तीन ऋतु
बोटाने दूर करू बटा या लाजेच्या
गालावरी रान दावाचे

कधी कधी रेचून ये
कधी कधी धावून ये
कधी कधी बिलगून येना जरा
कधी कधी हरवून ये
कधी कधी शोधून ये
कधी कधी चुकवून येना जगाला साऱ्या

मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेटना रे रोज रोज नव्याने


चित्रपट - देवा
स्वर - श्रेया घोषाल , सोनू निगम
संगीत - अमित राज
गीत - क्षितिज पटवर्धन