थांब ना तू कळू दे थांब ना
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना थांब ना थांब ना
सर सुखाची श्रावणी कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना थांब ना थांब ना
सर सुखाची श्रावणी कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
मी मं का वळणावरी त्या जीव का भांबावला
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ मग वाटे नवा
सर सुखाची श्रावणी कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
बाव-या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे
उसवणे होते खरे कि हे नव्याने गुंतणे
वाटतो आता उन्हाच्या उंब-याशी चांदवा
उंब-यापाशी उन्हाच्या चांदवा
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना थांब ना थांब ना
स्वर:अभिजित सावंत आणि बेल शेंडे
संगीत : निलेश मोहरीर
चित्रपट: मंगलाष्टक वन्स मोर