कुठे कधी हरवले कसे कोण जाणे
चोचीतले त्यांच्या गाणे
नभाच्या मनाला पडे घोर आता
उखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे कळेना
झुरे बाग आता सुनी सुनी सारी
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे
ती अवखळ वेळी किलबिल सारी
उगीच मनाला हुरहूर लावी
ओ संजे ला होई जीव हलवा रे
जे झाले गेले विसरुनी सारे
हा वेडा वारा सांगे या रे अंगणी पुन्हा
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे
चित्रपट - बालक पालक
संगीत - विशाल आणि शेखर
स्वर - शेखर रबजीयानि
शब्द - गुरु ठाकूर