Showing posts with label What's Up Lagna. Show all posts
Showing posts with label What's Up Lagna. Show all posts

Thursday, March 21, 2019

फुंकरीची वादळे - व्हॉटसअप लग्न



फुंकरीची वादळे आणि ओल्या सरी
त्यात उडती पाखरे रोज वरचे वरी
स्वप्न पाहु लागता जागेपनी
ऐकू येऊ लागते न बोले तरी

बांधलेली गाठ ही दोर ना हाती
चोरले कोणी मला अन कोणासाठी
चोर हे फुलपाखरू हाती ना ये
आणि त्यावरती पुन्हा शिरजोरी

जोडतो नावे अशी वरती जो बसतो
भेटतो आपण इथे तो तिथे हसतो
बात ही तर कालची खोटी खरी
त्यात ही फसवी हवा जादू परी

चित्रपट - व्हॉटसअप लग्न
स्वर - हृषिकेश रानडे, निहिरा जोशी देशपांडे
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर

Movie: Whatsup Lagna (2018)
Music: Nilesh Mohrir
Lyrics: Ashwini Shende
Singer: Hrishikesh Ranade, Nihira Joshi Deshpande

Thursday, February 14, 2019

तू जराशी - व्हॉट्स अप लग्न





मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
मन उतू जाते आता असे त्याचे सांडणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी… ये उराशी…

चित्रपट - व्हॉट्स अप लग्न
गीत - अश्विनी शेंडे
स्वर - हृषिकेश रानडे , निहिरा जोशी देशपांडे
संगीत - निलेश मोहरीर

Song: Tu Jarashi
Movie : What's Up Lagna (2018)
Music : Nilesh Mohrir
Lyrics : Ashwini Shende
Singers : Hrishikesh Rande, Nihira Joshi Deshpande