Showing posts with label Lai Bhari. Show all posts
Showing posts with label Lai Bhari. Show all posts

Sunday, March 17, 2019

जीव भुलला - लय भारी



जीव भुलला, रुणझुणला
हो, जीव भुलला, रुणझुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

हो, क्षण हळवा गुणगुणला
क्षण हळवा गुणगुणला
बावऱ्या या क्षणात श्वास हा गंधाळला

सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे, गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा

ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना

क्षण हळवा गुणगुणला
हो, क्षण हळवा गुणगुणला
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
दडले या…



चित्रपट - लय भारी (२०१४)
स्वर - श्रेया घोषाल - सोनू निगम,
गीत -  गुरू ठाकुर, 
संगीत - अजय अतुल,

Movie - Lai Bhaari
Singer - Shreya Ghoshal, Sonu Nigam
Lyrics - Guru Thakur
Music - Ajay Atul



Wednesday, July 9, 2014

माउली माउली -लय भारी



विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो…

तुला साद  आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली

गळा भेट घेण्या भीमेची निघाली
तुझ्या नाम घोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो…

भिड़े असमंती ध्वजा वैषणवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव  ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली

जरी बाप  तू  साऱ्या जगाचा पारी तू
आम्हा लेकरांचा विठू माऊली

माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली  रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातूनी साद  येते  तुझी
दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू  सावळा
मस्तकी चंदनाचा टिळा
लेउनी तुळशी माळा गळा ह्या
पाहसी वाट त्या राउळा
आज हरपल देह भान
जीव झाला खूळा बावळा 
पाहन्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा


भिड़े असमंती ध्वजा वैषणवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव  ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली

जरी बाप  तू  साऱ्या जगाचा पारी तू
आम्हा लेकरांचा विठू माऊली

माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली  रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल


चालला गजर जाहलो अधीर 
लागली नजर कळसाला 
पंचप्राण हे तल्लीन 
आता पाहीन  पांडुरंगाला 
देखिला कळस  डोइला तुळस 
धावितो चन्द्रभागेशी 
समिप दिसे पंढरी 
याच मंदिरी माऊली माझी 

मुख दर्शन व्हावे आता 
तू सकल जगाचा त्राता 
घे कुशीत गा  माऊली तुझ्या 
पायरी ठेवतो  माथा 

माउली माउली माउली माउली
माउली माउली माउली
पुंडलिका वार दे हारी  विठ्ठल
पंढरीनाथ महाराज की जय 


गीत - गुरु ठाकुर 
स्वर - अजय गोगवाले 
संगीत - अजय अतुल 
चित्रपट - लय भारी