जीव झाला येड़ा पीसा रात रात जागलो
पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन - २
जादू मंतरली कोनी सपनात जागपनी
नशिबी भोग असा दावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकड पाहिना
भीर भीर मनाला या घालू कसा बांध ग
अवसेचि रात मी अन पुनवचा तू चांद ग
नजरेत मावतिया दरी दूर धावतिया
मनीच्या ठाव तुझ्या मिळना
आता कोना म्होर घास तरी गिळना
गेला जळून जळून जीव प्रीत जुळना
जाई इस्कटून जिंदगी मी पाहिली
तरी झाली कुठ चुक मला कळना
सांदी कोप-यात उभा एकला कधीचा
लाज ना कशाची तकरार नाही
भास वाटतोया हे खर का सपान
सुखाच्या या सपनाला दार नाही
हे राख झाली जगण्याची हाय तरी जीता
भोळ प्रेम माझ अन भाबडी कथा
बघ जगतुया कस सा-या जन्माच हस
जीव चिमटित असा गावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला -२
माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकड पाहिना
चित्रपट - फॅण्ड्री
संगीत : अजय अतुल
गीत : अजय गोगावले
स्वर: अजय गोगावले