Showing posts with label divas ase ki. Show all posts
Showing posts with label divas ase ki. Show all posts

Thursday, December 22, 2011

मन तळ्यात - दिवस असे कि



मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात
मन नाजुकशी मोती माळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात

उरी चाहुलींचे मृगजळ
उरी चाहुलींचे मृगजळ 
उरी चाहुलींचे मृगजळ 
वाजे पाचोळा उगी कशात
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात 

इथे व-याला सांगतो गाणी माझे राणी
इथे व-याला सांगतो गाणी 
आणि झुळूक तुझ्या मनात
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात 

भिडू लागे  रात अंगालागी तुझ्या नखाची कोर नभात
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात 

माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा 
आणि चंद तुझ्या डोळ्यात
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात 
मन नाजुकशी मोती माळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात 

अल्बम : दिवस असे कि
स्वर :
गीत : संदीप खरे
संगीत : संदीप खरे

Saturday, February 27, 2010

सरीवर सर - दिवस असे कि






सरीवर सर…
दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

स्वर : संदीप खरे
संगीत : संदीप खरे
गीत : संदीप खरे
अल्बम : दिवस असे कि