जगन्याच्या वारीत मिळेना वाट हो..ओ
साठले मोहाचे धुके घनदाट हो..ओ
आपलीच मानस आपलीच नाती
तरी कळपाची मेंढराला भीती
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३
आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्याचा देव होता || २
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता || २
उजळावा दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचा-या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३
बुजगावन्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई ||२
खळ रीत रीत माझं बघूनी उमगलं
कुंपण हित शेत खाई ||२
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी
झेंडे येगळे येगळ्या जाती
सत्याचीच भक्ती सत्याचीच प्रीती
विठ्ठला कोनता झेंडा घेवू हाती || ३
स्वर : ज्ञानेश्वर मेश्राम
गीत :
संगीत : अवधूत गुप्ते
चित्रपट : झेंडा
No comments:
Post a Comment