Friday, January 1, 2010

मंद मंद तरी धुंद धुंद हा



मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे
फुलवी तुझे नाव बस तुझे नाव ओ माय लव
तुझे नाव बस तुझे नाव ओ माय लव

अन  मेघ सावळे काय संगती हे
कि नभी तुझे हे चित्र काढती हे
हा किनारा तुझ्या आठवणीत बुडला
अन उंच माड बघ तुला शोधती हे
दूर ते तीथे तेच का तुझे गाव ओ माय लव

मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे
फुलवी तुझे नाव बस तुझे नाव ओ माय लव


या  लाटा तुझिया देहावरच्या ना
अन क्षितीज तुझ्या कमरेवर आहे ना
हा मरुत स्पर्श हि तुझाच होता ना
अन धुंद गंध हि तुझाच आहे ना
ह्या सागरी तुझ्या होई मन हे नाव माय लव

मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे
फुलवी तुझे नाव बस तुझे नाव ओ माय लव

अल्बम : तिच्या डोळ्यातील गाव
स्वर : स्वप्नील बांदोडकर
संगीत : अवधूत गुप्ते
गीत:

No comments:

Post a Comment