Thursday, May 17, 2018

प्रेम हे


पाहता क्षणी वाटे कुणी अपुल
हे वेड जे स्वप्नातूनी जपलं
दिसताना  लपत हसताना रुसत
सरल्यावर उरत प्रेम हे...
हो... विरलेले धागे जुळलेले नाते
श्र्वासांचा बंध...प्रेम हे...
आभाळ हे दाटे मनी कसलं
हे वेड जे स्वप्नातून जपलं
स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र
चाहूल सुखाची प्रेम हे
हो...विरलेले धागे जुळलेले नाते
श्र्वासांचा बंध...प्रेम हे
प्रेम हे.... प्रेम हे....
हूर हूर आहे इशाऱ्यातूनी
हळुवार वाहे शहाऱ्यातूनी
नकळत कधी या ओठांवरी
येते कहाणी नव्याने जुनी
हो...बहरात फुलत विरहात झुरत
विरलेले धागे जुळलेले नाते
श्र्वसांचा बंध प्रेम हे
गीत :
संगीत :
स्वर :
मालिका : प्रेम हे


No comments:

Post a Comment