भलतच झालया आज
अलगद आली मनात
पहिलीच तरनी ही लाज
हो आग झनानल काळजामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
हो बदलून गेलया सार
पिरतीच सुटलया वार
अल्लड भांबावल्या
बिल्लोरी पाखरु न्यार
आल मनातल ह्या व्हटामंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
हां... कवळया मनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या
भरल ........ भरल (कोरस)
माझ गान मनामंदी
घुमतय कानामंदी
सुर सनईचा राया सजल
हे .. सजल उन वार नभ तार सजल
रंगल मन हळदीन रानी रंगल
सरल हे जगन्याच झुरन सरल
भिनल नजरन इशचारी भिनल
अग धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
सैराट झाल जी
आकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामदी सजलया डोरल
साताजन्माच नात
रुजलया काळजात
तुला र देवागत पुजल
हे.. रुजल बीज पिरतीच सजणी रुजल
भिजल मन पिरमान पुरत भिजल
सरल मन मारून जगन सरल
हरल ह्या पिरमाला समद हरल
अग कडाडल पवसामंदी
अन आभाळाला याट आल जी
चित्रपट - सैराट
संगीत - अजय अतुल
स्वर - चिन्मयी श्रीपाद, अजय गोगवले
शब्द - अजय अतुल
No comments:
Post a Comment