Saturday, May 7, 2016

झिंगाट - सैराट

उरात होतय  धड धड लाली  गालावर  आली
अन् अंगात भरलय वार ही पिरतीची  बाधा झाली

आता अधीर झालोया  बग  बधीर  झालोया
अन तुझ्याचसाठी  बनून  मजनू  माग  आलोया
आन उडतोय उगाट पळतोय झिंगाट
रंगात आलया झाल  झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट

आता उतावीळ  झालो  गुढघा  बाशिंग  बांधल
तुझ्या  नवाच मी  इनिशिल  टॅटून  गोंदल

हात  भरून आलोया लय दुरून  आलोया
अन  करून  दाढ़ी भारी  परफ्यूम मारुन आलोया
अग  समदया परात  म्या  लय  जोरात
रंगात आलया झाल  झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट


समदया  गावाला झालीया माझ्या  लग्नाची घाई
कधी  होनार  तू  रानी  माझ्या लेकराची  आई
आता  तर्राट झालोया तुझ्या घरात  आलोया
लई फिरून बांधावरून  कल्टी  मारून  आलोया
अता  ढिंचाक  जोरात  टेक्नो  वरात दारात  आलोया
झाल  झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट


गीत - अजय अतुल
सिनेमा - सैराट
संगीत  - अजय अतुल
स्वर - अजय अतुल 

No comments:

Post a Comment