तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
त्या गावाच्या वाटा सा-या मोहरलेल्या
तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहुरलेल्या || २
पण नसतो सहजी पत्ता गवसत तयाचा
धाग्यांनीच कधी ये उमटून मनी नकाशा
शंभर मरणांच्या बोलीवर मिळतो याचा ठाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
मोरपिसाच्या विमानातुनी इथे यायचे
आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे ||२
पाउल टाका सावध येथे अगणिक चकवे
गाव असे डोळ्यातून मोहक मनात उतरे
प्रवेश केवळ त्यांना झेलती जे प्राणावारती घाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
छाया नाही ऊनही नाही हवा सावळी
वा-यावरती सारंगाची धून कोवळी ||२
संथ धुके अंगाला बिलगून चालत असते
मन पक्ष्याचे हळवे अलगुज वाजत असते
झ-याझ-या परी सजल सहजसा होऊन जात स्वभाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
अल्बम : तिच्या डोळ्यातलं गाव
स्वर : स्वप्नील बांदोडकर
संगीत : अवधूत गुप्ते
गीत :
No comments:
Post a Comment