Saturday, December 5, 2009

अप्सरा आली



ओ... कोमल काया, कि मोहमाया पुनव चांदन  न्हाले,
सोन्यात सजले रुप्यात भिजले, रत्नप्रभा तनु ल्याले
हि नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली,
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली

हो... छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी  मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी कशी हनुवटी नयन तलवार

हि रती मदभरली दागी  ठिणगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली  ताजी रूप हि वा-याची
हि नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली,
मी यौवन बिजली पाहून थिजली, इंद्रसभा भवताली


अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली




चित्रपट : नटरंग
संगीत: अजय अतुल
गीत : गुरु ठाकूर

4 comments:

  1. i think you've got some words wrong. पसरली आली and हसली आली... here aali sounds incorrect. it could be laali and gaali respectively. thanks for writing it down!

    ReplyDelete
  2. रत्नप्रभा जणू न्याली.. it should be lyaali

    ReplyDelete
  3. सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
    शेलटी खुणावे कटी कशी हनुवटी नयन तलवार

    ReplyDelete
  4. धन्यवाद अभिप्रायाबद्दल .. चुका लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
    कमीत कमी चूका होतील ह्याची काळजी नक्कीच घेईन.

    ReplyDelete