Sunday, March 10, 2019
ऊन ऊन - मुळाशी पॅटर्न
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
ऊल ऊल उलघाल दोन जीव भांगल
एक जीव होण्या पायी उधाळली दंगल
उधाळली दंगल जीव घेणी दंगल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
आधन आधन चहाचं आधन
घोट चाखते व्हटान
पेशल पेशल दरवळे केशर
लागीर भन्नाट ग्वाडीन
समशेरी नजरेनं घायाळ मिठीत आभाळ
बळजोरी राकट मिठीची मधाळ पिरतीची
बिल्लोर टप्पोर डोळ्याची चांदणं मनाची
झिम पोरी मावळी घाटाची लढत श्वासांची
आसावली पोर मनी खुळावले ओढ
पेशल चहाची साखर मिठिवानी ग्वाड
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
पार्वळ नजरेत काळजात गलबल
खळी गाली डोहावानी रूप नशा अमल
जाग जाग सपनात दोन जीव टांगल
एक घोट घेण्यापाई उठाविल जंगल
उठाविल जंगल घोर घोर जंगल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
आधन आधन चहाचं आधन
घोट चाखते व्हटान
पेशल पेशल दरवळे केशर
लागीर भन्नाट ग्वाडीन
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
चित्रपट - मुळाशी पॅटर्न
स्वर - वैशाली माडे , अवधूत गुप्ते
गीत - प्रणित कुलकर्णी
संगीत - नरेंद्र भिडे
Movie - Mulashi Pattern
Song - Un Un Vhatat
Singers - Vaishali Madhe, Avadhut Gupte
Lyrics - Pranit Kulkarni
Music - Narendra Bhide
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment