Tuesday, March 5, 2019
जादुगरी - सविता दामोदर परांजपे
पुन्हा पुन्हा मला दे दिलासा
तुझा सखोल स्पर्श हवासा
जीव जाळूनही मोह टाळूनही
तोल जातो किती दूर राहूनही
का पुन्हा माझ्यावरी ही तुझी जादूगरी
तू जहर तू नशा
नसानसांत दाह नवासा
चेहऱ्यावर लावून चेहरे
का होई प्रेम साजरे
साद जाते कुणाला भेट होते कुणाशी
काय सांगू जगाला काय बोलू स्वतःशी
नाव ओठी तुझे मूक राहूनही
प्यास सरते कुठे पास येऊनही
मग पुन्हा माझ्यावरी ही तुझी जादूगरी
मी तुझा आरसा
तुझ्याविना देह नकोसा
तुझा सखोल स्पर्श हवासा....
चित्रपट - सविता दामोदर परांजपे
स्वर - स्वप्नील बांदोडकर
गीत - वैभव जोशी
संगीत - निलेश मोहरीर
Movie – SAVITA DAMODAR PARANJPE
Song – JAADUGARI
Lyrics – Vaibhav Joshi
Singer – Swapnil Bandodkar,
Music – Nilesh Moharir
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment