Tuesday, February 19, 2019

बघतोस काय मुजरा कर - शीर्षक गीत



 तुझ्या किर्तीच कथन
 आम्ही पुसलं कव्हाच
 तुझ्या गडाचे दगड
 कधी येऊन तू वाच
 कसे विसरतो रे आम्ही
 आम्हा साऱ्यांचा तू बाप मनामधी नाही भाव
 तरी पुजतो रे तुलाच
 घडू दे नवी हि कथा आता राजा.. रचू दे नवा इतिहास,
 तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा.. कळू दे साऱ्या जगास..
 ताठ होती माना
 उंच होतील नजरा
 या रयतेच्या राजाला
 मानाचा मुजरा...ssss
 "बघतोस काय मुजरा कर
 बघतोस काय मुजरा कर"
 तुझ्या मातीचा आदर
 माझ्या मातीत फुलू दे
 मला तुझ्यातच राजा
 तुला माझ्यात रुजूदे तुझ्या नजरेची ज्वाला पेटूदे माझ्या मनात
 हीच रयत करील
 तुझ्या गडाची राखण
 घडू दे नवी हि कथा आता राजा.. रचू दे नवा इतिहास..
 तूझ्या गडाची हि व्यथा आता राजा , कळू दे साऱ्या जगास...
 ताठ होती माना
 उंच होतील नजरा
 या रयतेच्या राजाला
 मानाचा मुजरा...ssss
 "बघतोस काय मुजरा कर
 बघतोस काय मुजरा कर"


चित्रपट - बघतोस काय मुजरा कर
स्वर - सिद्धार्थ महादेवन
गीत - क्षितिज पटवर्धन
संगीत - अमित राज

Movie: Baghtos Kay Mujara Kar
Music: Amit Raj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer: Siddharth Mahadevan

No comments:

Post a Comment