Saturday, December 7, 2013

मला वेड लागले प्रेमाचे - टाईमपास



रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे
हे नाव ओठी कोणाचे
का सांग वेड्या मना
मला भान नाही जगाचे
मला  वेड  लागले प्रेमाचे
मला  वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

नादावले धुंदावले
कधी गुंतले मन बावरे
न काळे कसे कोणा मुळे
सूर लागले मन मोकळे
हा भास कि तुझी  आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
हा मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला
कोणी भेटले माझे मला
खुलत कळी  उमलून हा
मन मोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे  नशा
मला साद घालती दाही दिशा
हा मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
मला वेड  लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे

चित्रपट : टाईमपास
गीत :गुरु ठाकूर
संगीत : चिनार
स्वर : स्वप्नील बांदोडकर , केतकी माटेगावकर 


No comments:

Post a Comment